देवदूत
*कोणासाठी तरी देव बना* *मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै.* अजूनही किती महीने कोरोनाचा कहर चालेल माहित नाही *सुरूवातीला काही दिवस* सहजतेने गेले आणि आता *संयमाचा बांध सुटला* एकमेकांना फोन करून *उधार उसनवारी* दिलेले पैसे मागायला सुरूवात झाली, कोणी *व्याज* मागायला सुरुवात केली कोणी राहत्या घराची व व्यवसायाच्या जागेची भाडे मागायला सुरुवात केली .. *इतके दिवस थांबलो, आता नाही थांबणार, असे फोन सुरू झाले.* पण कोणाच काहीच सुरू नाही, मग मित्रांनो तुम्ही ज्याला मागताय, *तो देणार कोठून?* हा विचार आपण केलाय का? तो जिथ जगतोय, तिथेच आपणही आहोत . *जे संकट त्याच्यावर आहे तेच तुमच्यावर आहे.* चूक कोणाचीच नाही *निर्सगाने* सर्वावर सारखीच *अवकृपा* केली आहे. थोडा माणुस म्हणून विचार करा, जो आजारातून वाचेल, तो ताण सहन नाही झाला तर *आत्महत्या* करेल *कोणाच्याही कुटुंबाला उध्वस्त करण्याच पाप करू नका.* जगला वाचला तर, आज ना उद्या देईल पैसे, पण *माणूसकी हरवू नका* एवढीच विनंती आहे. आजारपण, मुलांच्या शाळा, बँकेचे हप्ते, जागेचे भाडे, टॅक्स, शेताच...