कौटुंबिक जिव्हाळा !"
आईवडीलांच्या अडचणी आणि संघर्ष पहात मुले मोठी झाली पाहिजेत , मग त्यांना वेगळे संस्कार द्यायची गरज लागत नाही_. आज आपण स्वतः कितीही त्रास सहन करतोय, पण त्याची झळ आपल्या मुलांना लागू देत नाही कारण त्यांच्या मनावर आणि पर्यायाने अभ्यासावर त्याचा परिणाम होईल ही आपली चुक होत आहे, आपण त्यांच्यासाठी करत असलेला त्याग त्यांना दिसायला हवा , आपण सतत त्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात स्वतः तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहोत. दुःखाचा अनुभव असल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही , याला कोणीही अपवाद नाही . ज्याची किंमतच माहित नाही ते सांभाळता येत नाही कारण त्याबाबत *बेफिकीरी/negligence* तयार होत असते . ही बेफिकीरी विकृत वळणावर जायला वेळ लागत नाही आणि ही विकृती हाताबाहेर गेली की अशी मुले कोणाचेच ऐकत नाहीत.मग आईवडील आपले काय चुकले या एकाच प्रश्नाभोवती आयुष्यभर फिरत राहतात, हातात फक्त पश्चात्ताप असतो . ही परस्थिती आज घरोघरी आहे आणि आईबाप फक्त प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत . जगणे मुष्किल झाले आहे , शिक्षण अवाक्याबाह...