कौटुंबिक जिव्हाळा !"
आईवडीलांच्या अडचणी आणि संघर्ष
पहात मुले मोठी झाली पाहिजेत ,
मग त्यांना वेगळे संस्कार द्यायची गरज लागत नाही_.
आज आपण स्वतः कितीही त्रास सहन करतोय, पण
त्याची झळ आपल्या मुलांना लागू देत नाही कारण त्यांच्या मनावर आणि पर्यायाने अभ्यासावर त्याचा परिणाम होईल
ही आपली चुक होत आहे,
आपण त्यांच्यासाठी करत असलेला त्याग त्यांना दिसायला हवा , आपण सतत त्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात स्वतः तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहोत.
दुःखाचा अनुभव असल्याशिवाय
सुखाची किंमत कळत नाही ,
याला कोणीही अपवाद नाही . ज्याची किंमतच माहित नाही ते सांभाळता येत नाही कारण त्याबाबत *बेफिकीरी/negligence* तयार होत असते .
ही बेफिकीरी विकृत वळणावर जायला वेळ लागत नाही आणि
ही विकृती हाताबाहेर गेली की अशी मुले कोणाचेच ऐकत नाहीत.मग आईवडील आपले काय चुकले या एकाच प्रश्नाभोवती आयुष्यभर फिरत राहतात, हातात फक्त पश्चात्ताप असतो .
ही परस्थिती आज घरोघरी आहे आणि आईबाप फक्त प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत .
जगणे मुष्किल झाले आहे ,
शिक्षण अवाक्याबाहेर गेले आहे ,
नोकरी मिळत नाही ,
व्यवसाय करायला भांडवल नाही आणि
मुलांची ती मानसिक तयारी नाही ,
त्यांचे विवाह हा तर त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा प्रश्न झालेला आहे .
या सर्वांना एकच पर्याय_
"कौटुंबिक जिव्हाळा !"
आपली अडचण_ कुटुंबातील प्रत्येकाला
आपली वाटली पाहिजे आणि
आपला संघर्ष_ कुटुंबातील प्रत्येकाला
आपला वाटला पाहिजे .
हा जिव्हाळा नसले तर कमविणारा
कष्ट करून करून रक्त ओकून मेला तरी कुटुंबातील सदस्य म्हणतात*,
हा मूर्ख होता !
याला कसे जगावे समजलेच नाही !
जीवनाची मजा याला लुटता आलेली नाही !
आपल्या प्रश्नांची उत्तरे
यांच्या चरित्रात आहेत ,
इतरत्र शोधू नका
खूप मस्त विजू भारी लिहिलंस अश्याच तुझं लिखाण असच वाढत जावो हीच सदिछा
ReplyDeleteTy's shrikant
Deleteआजच्या घडीला सगळे सुशिक्षित तर आहेत पण सुसंस्कारी नाही....
ReplyDeleteआपल्या आईवडिलांनी केलेले कष्ट याची जाणीव आजच्या मुलांना नाही
आणि म्हणूनच 'कौटुंबिक' जिव्हाळा कमी होत चालला आहे..
हे बदलायला हवे!
👍👌👌
Deleteखुप छान विजय भाऊ
ReplyDelete