देवदूत
*कोणासाठी तरी देव बना*
*मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै.*
अजूनही किती महीने कोरोनाचा कहर चालेल माहित नाही *सुरूवातीला काही दिवस* सहजतेने गेले आणि आता *संयमाचा बांध सुटला* एकमेकांना फोन करून *उधार उसनवारी* दिलेले पैसे मागायला सुरूवात झाली, कोणी *व्याज* मागायला सुरुवात केली कोणी राहत्या घराची व व्यवसायाच्या जागेची भाडे मागायला सुरुवात केली ..
*इतके दिवस थांबलो, आता नाही थांबणार, असे फोन सुरू झाले.*
पण कोणाच काहीच सुरू नाही, मग मित्रांनो तुम्ही ज्याला मागताय, *तो देणार कोठून?* हा विचार आपण केलाय का?
तो जिथ जगतोय, तिथेच आपणही आहोत .
*जे संकट त्याच्यावर आहे तेच तुमच्यावर आहे.*
चूक कोणाचीच नाही *निर्सगाने* सर्वावर सारखीच *अवकृपा* केली आहे. थोडा माणुस म्हणून विचार करा, जो आजारातून वाचेल, तो ताण सहन नाही झाला तर *आत्महत्या* करेल *कोणाच्याही कुटुंबाला उध्वस्त करण्याच पाप करू नका.*
जगला वाचला तर, आज ना उद्या देईल पैसे, पण *माणूसकी हरवू नका* एवढीच विनंती आहे.
आजारपण, मुलांच्या शाळा, बँकेचे हप्ते, जागेचे भाडे, टॅक्स, शेताचा खर्च,
गावाकडे पाठवावे लागणारे पैसे, *अनेक समस्या आहेत पण पुन्हा उभे रहावे लागेल... एकमेकांच्या मदतीने*.
ज्याच्या कडे तुमचे पैसे आहेत तो क्षणभर *मेला* असा विचार करा व त्याला संधी द्या. इतक्या वर्षाचे *संबंध क्षणात तोडू नका* हे दिवस *जगवण्याचे व जगण्याचे* आहेत.
अनेक लोकांशी बोलताना जाणवत की ते आतून हलले आणि *धास्तावले* आहेत.
कस जगायचं यापेक्षा *लोकांना* *तोंड कस द्यायचे* हाच विचार प्रत्येकजण करतोय.
*माणसाचा जन्म मिळालाय गिधाडे होऊन विचार नको करूया*
या परिस्थितीत स्वतःला व इतरांना *सांभाळून घेऊया* तो
माणूस तुमचे उपकार आयुष्यात कधीच विसणार नाही.
*व्यवहार कोणालाही चुकला नाही* व चुकणारही नाही
*देवांनीही देऊळ बंद केलेय* आता तुम्ही त्याच काम करा
*कोणासाठी तरी देव बना* कदाचीत देवालाही हेच अपेक्षित असेल.. *माझ्या दारात इतके दिवस येणारा माणूस खरच माणूस झालाय का हेच* अपेक्षित असेल त्याला.
नाहीतरी तो हिशोब ठेवणारच आहे सर्वांचा.
*मदत व सेवा हेच देवाच दुसर रूप* आहे.
हा blog जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व *कोणाच्यातरी आयुष्यात देवदूत बना.*
*माणूस* बना देश उभा करण्यासाठी अशी *संधी* पुन्हा नाही..
🙌👌✌️
ReplyDeleteTy's bro
DeleteSuperb viju
ReplyDeleteTysm
DeleteNice one bro
ReplyDeletenice
ReplyDeleteTysm
DeleteChhan 👏👏
ReplyDeleteTysm
Delete👌👌👍👍
ReplyDeleteTysm
DeleteNice...
ReplyDeleteTysm
DeleteMast ch !
ReplyDeleteTysm
DeleteBhariich..!👌✌️
ReplyDeleteTysm
Delete