देवदूत

*कोणासाठी तरी देव बना* 
   
*मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै.* 
अजूनही किती महीने कोरोनाचा कहर चालेल माहित नाही *सुरूवातीला काही दिवस* सहजतेने गेले आणि आता  *संयमाचा बांध सुटला* एकमेकांना फोन करून *उधार उसनवारी* दिलेले पैसे मागायला सुरूवात झाली, कोणी *व्याज* मागायला सुरुवात केली कोणी राहत्या घराची व व्यवसायाच्या जागेची भाडे मागायला सुरुवात केली ..
 *इतके दिवस थांबलो, आता नाही थांबणार, असे फोन सुरू झाले.* 
पण कोणाच काहीच सुरू नाही, मग मित्रांनो तुम्ही ज्याला मागताय, *तो देणार कोठून?*  हा विचार आपण केलाय का? 
तो जिथ जगतोय, तिथेच आपणही आहोत .
 *जे संकट त्याच्यावर आहे तेच तुमच्यावर आहे.* 
चूक कोणाचीच नाही *निर्सगाने* सर्वावर सारखीच *अवकृपा* केली आहे. थोडा माणुस म्हणून विचार करा, जो आजारातून वाचेल, तो ताण सहन नाही झाला तर *आत्महत्या* करेल *कोणाच्याही कुटुंबाला उध्वस्त करण्याच पाप करू नका.* 
जगला वाचला तर, आज ना उद्या देईल पैसे, पण *माणूसकी हरवू नका* एवढीच विनंती आहे. 
आजारपण, मुलांच्या शाळा, बँकेचे हप्ते, जागेचे भाडे, टॅक्स, शेताचा खर्च, 
गावाकडे पाठवावे लागणारे पैसे, *अनेक समस्या आहेत पण पुन्हा उभे रहावे लागेल... एकमेकांच्या मदतीने*. 
ज्याच्या कडे तुमचे पैसे आहेत तो क्षणभर *मेला* असा विचार करा व त्याला संधी द्या. इतक्या वर्षाचे *संबंध  क्षणात तोडू नका* हे दिवस *जगवण्याचे व जगण्याचे* आहेत. 
अनेक लोकांशी बोलताना जाणवत की ते आतून हलले आणि *धास्तावले* आहेत. 
कस जगायचं यापेक्षा *लोकांना* *तोंड कस द्यायचे* हाच विचार प्रत्येकजण करतोय. 
 *माणसाचा जन्म मिळालाय गिधाडे होऊन विचार नको करूया* 
या परिस्थितीत स्वतःला व इतरांना *सांभाळून घेऊया* तो
माणूस तुमचे उपकार आयुष्यात कधीच विसणार नाही. 
 *व्यवहार कोणालाही चुकला नाही* व चुकणारही नाही
 *देवांनीही देऊळ बंद केलेय* आता तुम्ही त्याच काम करा

 *कोणासाठी तरी देव बना* कदाचीत देवालाही हेच अपेक्षित असेल.. *माझ्या दारात इतके दिवस येणारा माणूस खरच माणूस झालाय का हेच* अपेक्षित असेल त्याला. 
नाहीतरी तो हिशोब ठेवणारच आहे सर्वांचा. 
 *मदत व सेवा हेच देवाच दुसर रूप* आहे. 
हा blog जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व *कोणाच्यातरी आयुष्यात देवदूत बना.*
 
 *माणूस* बना देश उभा करण्यासाठी अशी *संधी* पुन्हा नाही..

Comments

Post a Comment